टाकळीभान प्रतिनिधी-नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी आप्पासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून, मंडलाधिकारी कुसमुडे भाऊसाहेब यांनी शिंदे यांची सरपंच निवडीचे पत्र दिले, यावेळी माजी सरपंच विद्या बहिरट यांनी, नूतन सरपंच आप्पासाहेब शिंदे यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी गावात मोठी फटाकड्याची आतिषबाजी करूनआनंद साजरा करण्यात आला.
यावेळी नूतन सरपंच शिंदे यांनी सांगितले की, गावातील प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक,धार्मिक, आरोग्य व शिक्षण, रस्ते,लाईट,पाणी या कामांना प्राधान्य दिले जाईल, तसेच घोगरगावच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला तडाजा जाऊन देणार नाही . मिळाल्या संधीचं सोनं करेल,व गावाला वैभव प्राप्त करून देईल ,तसेच गावात अनेक विकास काम केले जाणार असे आश्वासन नूतन सरपंच शिंदे यांनी दिले.
यावेळी उपसरपंच किरण नरहरी शिरसाठ , माजी सरपंच विद्या सदाशिव बहिरट ,सदस्य ज्ञानदेव टेकाळे,
सौ,मीनाबाई पटारे, सौ सायरा शेख , दौलत शिरसाठ , सौ जया सुभाष बोरसे ,सौ जयश्री आबासाहेब घोगरे,
बाळासाहेब खरोशे ,माधव बहिरट , ग्रामविकास अधिकारी तुपे यशवंत , व ग्रामपंचायत कर्मचारी फकीरचंद शिरसाठ, काशिनाथ खरोशे ,
प्रशांत बहिरट ,रामेश्वर बहिरट,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments