गणेश छल्लारे यांना 'कामगार भुषण' पुरस्कार



टाकळीभान (प्रतिनीधी) - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील जगदंबा युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक तसेच श्रीराम असंघटीत बांधकाम संघनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश उर्फ किशोर छल्लारे यांना महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा महासंघ यांचेकडून असंघटीत बांधकाम कामगारांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केल्याबद्दल महिला जिल्हाअध्यक्ष सौ. दिपाली फरगडे यांचे हस्ते कामगार भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला .

       यावेळी बोलतांना गणेश छल्लारे यांनी सांगीतले की लोकनेते भानुदास मुरकुटे व युवक नेते निरज मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे ई श्रम कार्ड, बांधकाम कामगारांचे स्मार्ट कार्ड, बांधकाम साहित्य पेटी, शैक्षणीक अनुदान, शैक्षणीक शिष्यवृत्ती, उज्वला गॅस, डोल प्रकरणे, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून देणे, वयोश्री योजना आदींसह विविध शासकीय योजनांची सर्वसामान्यांची कामे मार्गी लावली असुन अनेक वर्षापासुन कुठलेही काम निस्वार्थी रूपाने व एकनिष्ठतेने केल्यामुळेच ही केलेल्या कामाचीच हि पुरस्कार रूपाने पावती मिळालीअसून यापुढेही संघटनेला.

बरोबर घेऊन या माध्यमातून बांधकाम वर्गाची कामे व असंघटीत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
    याप्रसंगी सौ. दिपाली फरगडे महिला जिल्हा अध्यक्ष सरपंच सेवा संघ तथा बिनविरोध सरपंच भैरवनाथ नगर, माजी जि. प. बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे, माजी नगरसेविका प्रनितीताई चव्हाण, कामगार नेते दीपक चव्हाण, स्वप्नील सोनार, प्रदीप आहेर, खादी ग्रामोद्योग चेअरमन प्रवीण फरगडे, डॉ. मोहन शिंदे, उपसरपंच काळे मावशी, आर पी आयचे सागर अमोलिक, बाबुलाल शेख, मेजर यादव, भैया कुमावत सर्व ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ, सर्व जिल्हा परीषद शाळेचे शिक्षक व कर्मचारी वर्ग तसेच बांधकाम कामगारांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थीत होते. या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून छल्लारे यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments