लिहाखेडी येथील जि प शाळेत महाराष्ट्राचे मान चिन्ह व राज्य पुष्प असलेल्या जारूळचे रोपण,- वृक्ष व वन्यजीव संवर्धनासाठी डॉ. संतोष पाटील यांचा हरितवारी उपक्रम

 

दिलीप शिंदे सोयगाव
 सोयगाव दि.30- जारूळ चे सुंदर फुलं हे महाराष्ट्राचे राज्य पुष्प असून त्यास "प्राईड ऑफ इंडिया "( भारताचा गौरव)ही म्हटले जाते.मे  ते जून या दरम्यान या झाडास फुलं लगडतात.जारूळ चे फुलं हे महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प व मानचिन्ह आहे.पर्यावरण व वन्यजीव, जैवविविधता संवर्धक, सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठान चे डॉ. संतोष पाटील यांनी आज आपल्या हरितवारी उपक्रमाद्वारे लिहाखेडी येथील येथील जि प शाळेत" जारूळ" च्या 5 रोपांचे रोपण केले. 

सदर वृक्ष जैववीवीधते साठी खुप उपयोगी आहे. पाटील यांनी पतंग मुक्त आकाश व पक्षांची निसर्गातील भूमिका विद्यार्थ्यांना पटवून दिली. पतंग न उडवण्याची, फटाकेमुक्त पर्यावरण ही शपथ ही सर्व विद्यार्थ्यां नीं घेतली. त्यांच्या वतीने "राज्यपुष्प जारूळ -गौरव भारताचा "ही फ्रेम ही शाळेस भेट देण्यात आली.या उपक्रमाचे आयोजन  शाळेचे उपक्रम शील व आदर्श शिक्षक राजेश सि रसाठ यांनी केले होते.सामाजिक वनिकरन विभाग सिल्लोड चे वनपरीक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे व वनरक्षक जी .वाय. परदेशी यांच्या मार्गदरनाखाली शाळेत हरितसेनेची स्थापना ही करण्यात आली.यावेळी सरपंच बाजीराव डापके, विश्वास कळात्रे, प्रीतीमाला गाडेकर, स्वप्ना कुडके, ललिता पंडित या शिक्षिका उपस्थित होत्या. 

 ---जैवविविधतेतील भूमिका-- जारूळच्या पानांवर "लार्ज ओक ब्ल्यू" व "सेन्टॉर ओक ब्ल्यू" ही फुलपाखरे अंडी घालतात व त्यांची कोष अवस्था विकसित होते.या फुलांवर झायलोकॉर्पा ,एपीस फ्लोरिया,कारपेंटर भुंगे व अनेक फुलपाखरे हे परागीभवनाची भूमिका बजावून , मकरंद शोषतात.जारूळ बीज लाल छातीचा पोपट व इतर पक्षी खातात.
       डॉ.संतोष पाटील, पर्यावरण संवर्धक,अभिनव प्रतिष्ठान,सिल्लोड



Post a Comment

0 Comments