संकष्ट चतुर्थी निमित्त श्री गणेश मंदिरामध्ये ठीक ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी!

शिर्डी (प्रतिनिधी) शुक्रवार 17 जानेवारी 2025 रोजी या नवीन वर्षात येणारी ही पहिली संकष्ट चतुर्थी असून ती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. श्री गणेशाच्या ठिकठिकाणी असणाऱ्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. घरोघरी श्री गणेशाची उपासना व उपवास करत संकष्ट चतुर्थी मानली जात आहे.

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात.एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे.संकष्टी चतुर्थी, ज्याला संकटहार चतुर्थी असेही म्हणतात, हा गणेशाला समर्पित हिंदू दिनदर्शिकेमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे. हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो (अंधकारमय चंद्र चरण किंवा चंद्राचा अस्त होणारा पंधरवडा). ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी सर्व संकष्टी चतुर्थीच्या दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 
संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. ते पुरुष व स्त्रिया दोघेही करतात.दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो.
शुक्रवारी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे श्री गणेश मंदिरामध्ये भाविकांचे सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments