शिर्डी विमानतळावर कार्यकर्ते व मित्र परिवाराच्या वतीने केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांचे स्वागत करून करण्यात आला सत्कार! नवीन वर्षाच्या त्यांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा!

शिर्डी (प्रतिनिधी)
केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ  हे गुरुवार 2 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी शिर्डीला आले.

ते  शिर्डी विमानतळावर उतरले असता तेथे त्यांचे विमानतळ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्याचप्रमाणे त्यांचा मित्र परिवाराच्या व कार्यकर्त्यांच्या वतीने सचिन शिवाजी आगलावे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी  विशाल देशमुख ,सा.वि.बु.चे ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे, स्वप्निल पारडे, शिवाजीराव आगलावे, साईनाथ सदाफळ, संतोष अंडागळे, आदीं उपस्थित होते. नामदार मुरलीधर मोहोळ हे निस्सीम साईभक्त असून ते  नेहमी शिर्डीला येत असतात. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच ते शिर्डीला साई दर्शनाला आले होते. यावेळी औपचारिक गप्पा मारताना त्यांनी आपण लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीही शिर्डीत साई दर्शनाला होतो. साईंच्या आशीर्वादामुळेच निवडून आलो आणि मंत्री झालो. त्यामुळेच मंत्री झाल्यावर बाबांच्या दर्शनासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. असे सांगत उपस्थित सर्वांना त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments