शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सन 2025 या नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन या नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी सहकार विभागाचे अधिकारी गणेश पुरी, रावसाहेब खेडकर, साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व सर्व संचालक आणि शिर्डीतील गजानन शेर्वेकर व इतर ग्रामस्थ, संस्थांनचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे दोन जानेवारी रोजी शिर्डीला आले असता त्यांच्या हस्ते या संस्थान कर्मचारी सोसायटीच्या नवीन दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नामदार मुरलीधर मोहोळ यांचा सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी त्यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी ना. मुरलीधर मोहोळ यांनी श्री संस्थान कर्मचारी सोसायटीच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सोसायटीचे सर्व संचालक पदाधिकारी सभासद कर्मचारी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी सांगितले की, साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सन 2025 नवीन दिनदर्शिका छापून तिचे प्रकाशन नुकतेच नामदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले असून या दिनदर्शिका संस्थान मधील सर्व कायम कर्मचारी, 598 कर्मचारी आणि इनसोर्स कर्मचाऱ्यांसाठी मोफत दिनदर्शिका देण्यात येणार आहे. तरी सर्व संस्थान कर्मचाऱ्यांनी साई संस्थान कर्मचारी सोसायटीच्या कार्यालयातून या नवीन दिनदर्शिका घेऊन जाव्यात असे आवाहन त्यांनी केले असून या नवीन दिनदर्शिकेत साईबाबांची अकरा वचने, त्याचप्रमाणे साई संस्थानचे विविध सण उत्सवाचे कार्यक्रम देण्यात आले आहेत. तसेच श्री साईबाबांच्या विविध छबी, साईबाबांचे वर्षभरातील उत्सव कार्यक्रम आणि पर्यावरणाचा संदेश असलेली अशी ही दिनदर्शिका छापलेली आहे. असे यावेळी साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी सांगितले. यावेळी या सोसायटीचे सर्व पदाधिकारी ,संचालक, सभासद व संस्थान कर्मचारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
0 Comments