जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन



टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीवाडी येथे थोर समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या शिक्षिका सीमा खेडकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.   

     
    यावेळीमुख्याध्यापक बाळासाहेब क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले, समाज शिक्षित करण्यासाठी महात्मा जोतीबा फुले यांच्या कार्यात साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे आज प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अज्ञानरूपी अंधकाराचा नायनाट करून साक्षरतेची ज्ञानरूपी मशाल त्यांनी पेटविल्याचे सांगितले,                        शाळेच्या शिक्षिका मनीषा टोणपे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य याबाबत माहिती दिली. शाळेच्या विद्यार्थिनी पूजा अहिरे व आरुषी गायकवाड यांनी क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण कार्य याबाबत माहिती दिली. प्रशिक्षणार्थी रोहित मालकर यांनी क्रांतीज्योती या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर स्वरचित कविता याप्रसंगी सादर करून आपले मनोगत व्यक्त केले.   यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केला,   याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब क्षीरसागर, मनीषा टोणपे, सीमा खेडकर, रोहित मालकर, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments