केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री ना. शिवराजसिंग चव्हाण यांनी संपत नाही शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे दर्शन! संस्थांनच्या वतीने करण्यात आला सत्कार!

शिर्डी ( प्रतिनिधी)केंद्रीय  कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री नामदार शिवराज सिंग चव्हाण यांनी सपत्नीक माध्‍यान्‍ह आरतीकरीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. ते नेहमी साई दर्शनाला येत असतात. साईदर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्‍कार केला.

यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यादी उपस्थित होते.केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण  दरवर्षी एक जानेवारी रोजी सहपरिवार शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतात. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री असतानाही ते अनेकदा शिर्डीला साई दर्शनासाठी आले होते. यानववर्षी बुधवारी 1 जानेवारी 2025 ला दिल्लीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात  कॅबिनेट बैठक असल्यामुळे त्यांना साईदर्शनासाठी शिर्डीला येता आलं नाही. मात्र दोन जानेवारी गुरुवार रोजी त्यांनी शिर्डीला सहपरिवार भेट देऊन साई समाधी मंदिरात दुपारची साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावली. साईंच्या दर्शनानंतर शिवराज सिंग चौहान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरुच राहील. त्याचबरोबर कांदा निर्यात मूल्य चाळीस टक्क्यांवरून वीस टक्क्यांवर आणल्याचे व  कांद्याचे भाव कमी झाले तर नाफेड आणि इतर संस्थाच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जाईल. असे सांगत त्यामुळं कांदा उत्पादकांना त्याचा चांगला भाव मिळेल . त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.असा निर्णय  या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना मात्र त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव दिले दिल्ली सरकारने ते प्रस्ताव दिले नाही त्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही. दिल्लीतील शेतकऱ्यांना    या योजनेचा लाभ मिळत नव्हता. म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, राजकारण बाजूला ठेवून राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे. असेही केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी यावेळी सांगितलं. ना.शिवराज सिंग चव्हाण साई दर्शनानंतर बाभळेश्वर येथील पायरन्स येथील कार्यक्रमासाठी गेले.

Post a Comment

0 Comments