जगद्गुरु नरेंद्र महाराज सेवा केंद्र टाकळीभान यांच्यावतीने महारक्त दान शिबिर संपन्न



टाकळीभान-: प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी रविवार दि.१२ 12 जानेवारी रोजी जगद्गुरु नरेंद्र महाराज सेवा केंद्र टाकळीभान यांच्या वतीने महा रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते झाले.या रक्तदान शिबिरामध्ये ५३ रक्तदात्यांनीआपला सहभाग नोंदविला.
             



 यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे ,मार्केट कमिटीचे संचालक मयूर पटारे, विलास दाभाडे, अविनाश लोखंडे, पृथ्वीराज उंद्रे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, बाळासाहेब कोकणे, मधुकर गायकवाड आदी उपस्थित होते.


 कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगद्गुरु नरेंद्र महाराज संप्रदायाचे तालुकाध्यक्ष बडाख मेजर, निपुंगे, केंद्रप्रमुख दादासाहेब जाधव, नारायण परदेशी, दत्तात्रय साळुंखे, गणपत कांबळे, संजय रामटेके, बाळासाहेब दातीर सौ पटारे ताई , जाधव ताई, दातीर ताई, खेमनर, परदेशी बाई, सुमनबाई पटारे आदींसह जगद्गुरु नरेंद्र महाराज सेवा केंद्र टाकळीभान व पंचक्रोशीतील भक्त मंडळ व सदस्य यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments