सावळीविहीर (प्रतिनिधी) राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक व परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने संपन्न झाला.
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सावळीविहीर बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात झेंडे घेऊन भारत माता की, जय वंदे मातरम, जय जवान जय किसान, अशा घोषणा देत सकाळी गावातून फेरी काढण्यात आली. शिक्षक व ग्रामस्थही प्रभात फेरीमध्ये सामील झाले होते. त्यानंतर सावळीविहीर ग्रामपंचायत समोर सौ अनुजा आनंद जपे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळीविहीर बुद्रुक येथे ग्रामपंचायत सदस्य गणेश एकनाथराव आगलावे यांच्या हस्ते ध्वजपूजन करून ध्वजारोहण झाले. त्यानंतर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक विद्यालयात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम सोपानराव जपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. विविध देशभक्ती गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. व उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी शिक्षक पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावळीविहीर वाडी येथील शाळेमध्ये ग्रामपंचायत सदस्या शैलजा महेंद्र पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर कारवाडी येथील श्री हनुमान क्लास प्राथमिक शाळेमध्ये सौ. रूपालीताई संजय जपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर लक्ष्मीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य संतोष विश्वनाथ कसबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. येथेही विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.येथे भारताचा प्रजासत्ताक दिन सर्व विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
0 Comments