राहुरी तहसीलदारांचा शिक्का बनवत, बनावट कागदपत्रावर सही करणारा २४ तासात जेरबंद




राहुरी / प्रतिनिधी : तहसीलदारांचा गोल शिक्का तयार करवून घेत त्या आधारे बनावट कागदपत्रांवर सह्या करत असलेल्या व्यक्तीला अवघ्या २४ तासात जेरबंद करून त्याची भांडाफोड करण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. 

    यासंदर्भात तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिनांक २३ जानेवारी रोजी यांनी राहुरी पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून गु र नं ४२/ २०२५ कलम ३३६(३) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
     सदर गुन्ह्यातील आरोपी लक्ष्मण सोपान दळे वय- ३९ रा. कुंभार गल्ली राहुरी याला पोलिसांनी त्याचे राहत्या घरून ताब्यात घेऊन त्याला अटक केली  सदर आरोपीला न्यायालयात हजर करून पाच दिवस पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार  विजय नवले हे करीत आहे
       सदरची कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर श्री.वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर डाॅ. बसवराज शिवपुजे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नवले, संदीप ठाणगे, सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, नदीम शेख यांनी केलेली आहे.





  

Post a Comment

0 Comments