सावळीविहीर ग्रामपंचायती समोर भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न!

शिर्डी (प्रतिनिधी )
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
   रविवार 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतती समोर आकर्षक रांगोळ्या काढून सुशोभीकरण करण्यात आले होते. हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या प्रभात फेरीनंतर येथे ग्रामपंचायत सदस्या सौ अनुजा आनंद जपे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

तत्पूर्वी सरपंच ओमेश जपे यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ध्वजगीत राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत झाले. त्यानंतर सर्वांनी भारताचे संविधान गायले. तसेच भारत क्षयमुक्त होण्यासाठी सर्वांनी शपथ घेतली. या कार्यक्रमाला गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते विद्यार्थी पालक शिक्षक देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments