मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने सावळीविहीर येथे एक जानेवारीपासून भव्य क्रिकेट स्पर्धा!

शिर्डी (राजकुमार गडकरी) राहाता तालुक्यातील 
सावळीविहीर बुद्रुक येथे मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीने सरपंच चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे एक जानेवारी 2025 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मॉर्निंग क्रिकेट क्लब सावळीविहीर यांच्या वतीने सरपंच चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आलेल्या असून एक जानेवारी 2025 ला सकाळी दहा वाजता सावळीविहीर फाटा येथील गारगोटी मैदानावर या क्रिकेट स्पर्धांचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या क्रिकेट संघाला सरपंच ओमेश साहेबराव जपे यांच्याकडून 31 हजार रुपये तर द्वितीय संघाला सावळीविहीर खुर्द चे मा. सरपंच महेश जमधडे यांच्याकडून 21 हजार रुपये त्याचप्रमाणे तृतीय येणाऱ्या क्रिकेट संघास सावळीविहीर बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य गणेश एकनाथराव आगलावे यांच्याकडून 11000 रुपयांचे बक्षीस तर चौथा क्रमांक येणाऱ्या क्रिकेट संघास चतुर्थ बक्षीस म्हणून सावळीविहीर बुद्रुकचे उपसरपंच विकास जपे यांच्याकडून सात हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर संदीप विघे यांच्याकडून 11000 रुपये उत्कृष्ट संघाला पारितोषिक देण्यात येणार आहे. सेमी फायनल मध्ये जाणाऱ्या प्रत्येक संघास बारा टी-शर्ट दिले जाणार आहेत. टी-शर्ट सौजन्य आशिष आगलावे, किरण जपे, गोरख लिपणे, अविनाश खर्डे, यांचे राहणार आहे. या स्पर्धेत विजयी संघाला देण्यात येणारी ट्रॉफी ही सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे यांच्याकडून दिले जाणार आहे. मंडप साऊंड सौजन्य मनोज काळे, कैलास पळसे , ओमकार दहिवाळ यांचे राहणार असून  बॉल सौजन्य धनंजय जाधव यांचे राहणार आहे. ग्राउंड सौजन्य साठी वैभव जमधडे, अविनाश दीक्षित, गणेश पाटील,विकी जाधव, यांचे राहणार असून मॉर्निंग क्रिकेट क्लबला टी-शर्ट अभिषेक सदाफळ यांच्याकडून राहणार आहेत. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या संघाला चार हजार रुपये प्रवेश फी राहणार आहे. या क्रिकेट स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य मा. ग्रा. सदस्य स्वप्निल पारडे, मा. उपसरपंच गणेश कापसे यांचे राहणार असून क्रिकेट संघांनी चंद्रकांत जपे संतोष फुलारे, पंकज निकम, विशाल अहिरे ,यांच्याशी संपर्क करावयाचा आहे. सर्व स्पर्धा आयोजकांनी घालून दिलेल्या नियमानुसार होणार आहेत. या सर्व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी
 मॉर्निंग क्रिकेट क्लब सावळीविहीरचे शंकर सोळंके, अमोल दहिवाळ, पुंजाराम जपे, गणेश पाटील, देवा सोळंके, रवी माळी ,अनिल जाधव, वैभव जमधडे ,सतिष काळे, संदीप जपे, रवी पळसे, रवी लोहकणे, साहिल जाधव, अशोक त्रिभुवन, अजय घुले ,सार्थक पळसे, गणेश जपे, शुभम आगलावे, कृष्णा आगलावे, अनुज पळसे, रोहन जगताप ,सागर माळी, विनोद घुले, अभिषेक सदाफळ, प्रसन्न रासने ,शुभम वदक, बंटी गोसावी. ऋतिक जपे. आकाश जपे, आदी परिश्रम घेत आहेत. तरी या क्रिकेट स्पर्धा बघण्याचा क्रिकेट प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन मॉर्निंग क्रिकेट क्लबने एका पत्रकांद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments