भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज ३१ डिसेंबरला शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे दर्शन!

शिर्डी (राजकुमार गडकरी) भारताचे माजी राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी आज मंगळवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईबाबांचे समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थान च्या वतीने संस्थांनच्या तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई मूर्ती, श्री साई सत चरित्र ग्रंथ, शाल, देऊन त्यांचा सत्कार केला. 
यावेळी दादरा व नगर हवेली दमन व दिव व लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
रामनाथ कोविंद भारताचे १४वे राष्ट्रपती होते. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाची निवडणूक लढले आणि  विजयी झाले होते. ते २५ जुलै, २०१७ पासून २५ जुलै २०२२ पर्यंत भारताच्या राष्ट्रपती पदावर होते. त्यापूर्वी ते बिहारमध्ये राज्यपाल या पदावर इ.स.२०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर ते भारताचे राष्ट्रपती या पदावर इ.स.२०१७ ते २०२२ पर्यंत कार्यरत होते.
रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेश या राज्याच्या कानपूर जिल्ह्यातील आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद शिर्डीत आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त तैनात होता. शिर्डी विमानतळावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Post a Comment

0 Comments