टाकळीभानचे भूमिपुत्र शिवम अनिल पटारे याने स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पॉईंट मिळवून उत्कृष्ट खेळी करत उत्तुंग यश संपादन केले .

टाकळीभान( प्रतिनिधी )- 
नुकत्याच बालेवाडी पुणे येथे पार पडलेले ११वे पर्व मधील प्रो- कबड्डी लीग स्पर्धा २०२४ मध्ये पार पडल्या, यामध्ये 
 भूमिपुत्र शिवम अनिल पटारे याने या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पॉईंट मिळवून उत्कृष्ट खेळी करत उत्तुंग यश संपादन केले आहे.

        या स्पर्धेची सुरुवात हैदराबाद येथून झाली त्यानंतर नोएडा व बालेवाडी पुणे येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये 12 संघांनी सहभाग घेतला होता, या साखळी स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला 22 मॅचेस खेळाव्या लागल्या प्रत्येक संघाला दोनदा खेळण्याची संधी मिळाली. 
        शिवम पटारे हा टाकळीभानचा खेळाडू हरियाणा टिलर्स   संघाकडून खेळला होता. या हरियाणा टिलर्स संघाचे नेतृत्व जयदीप दहिवा यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत होता. या हरियाणा टिलर्स संघाचे प्रशिक्षक मंत्रीत सिंह हे होते. या स्पर्धेमधील सेमी फायनल यूपी योद्धा व हरियाणा टिलर्स संघात झाली. तर अंतिम सामना पटना पायरेट्स व हरियाणा टिलर्स संघामध्ये झाला. या अंतिम सामन्यामध्ये शिवमणे उत्कृष्ट खेळी करत  पकडीचे ५ पॉईंट तर रेडचे ४ पॉईंट असे त्यास एकूण ९ पॉईंट मिळाले. व अंतिम सामन्यांमध्ये हरियाणा टिलर्स संघ विजयी झाला. या पूर्ण प्रो कबड्डी लीग स्पर्धेमध्ये टच पॉईंट १५८ तर पकडीचे १२ पॉईंट मिळविले . शिवमणे या स्पर्धेत ६ सुपर टेन पूर्ण केले. शिवमला या प्रो कबड्डी लीग स्पर्धेमध्ये ८ वेळेस उत्कृष्ट खेळाडू (मॅन ऑफ द मॅच) म्हणून गौरवण्यात आले. या झालेल्या स्पर्धेमध्ये शिवम सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू ठरला. 
       
        शिवमला बालपणी व शालेय जीवनात त्याचे क्रीडा शिक्षक वडील अनिल पटारे सर यांचे कबड्डी खेळाचे बालवयातच  बाळकडू मिळाले. तसेच महाविद्यालयीन जीवनामध्ये अनिल जगदाळे, कैलास जगदाळे (आष्टी) वाकचौरे सर (भेंडा) यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच अहिल्यानगर  व . अहिल्यानगर हौशी कबड्डी असोसिएनचे अध्यक्ष खा. निलेश लंके, सचिव प्रा. शशिकांत गाडे, सहसचिव विजय मिस्कील, शंतनु पांडव, प्रा. सुनील जाधव, निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार, भारताचा कबड्डी संघाचा मा. कप्तान खेळाडू पंकज शिरसाठ यांचे अनमोल सहकार्य लाभले. 
       शिवम पटारे याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. आ. हेमंत ओगले, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश आदिक, मा. आ. भानुदास मुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, मा. सभापती नानासाहेब पवार,मा्जी स . वंदनाताई मुरकुटे आदींसह गावातील पदाधिकारी, मान्यवर, कबड्डी खेळाडू क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ यांनी शिवम पटारे यांचे अभिनंदन केले.

(चौकट:
शिवमणे  राष्ट्रीय खेळाडू म्हणून यश मिळावे ही आमची मनापासून इच्छा होती, व त्याने ती पूर्ण केली व त्याने असेच उत्कृष्ट खेळी करून कुटुंबीयांचे व गावाचे नाव रोशन करावे, त्याच्या खेळाबद्दल आमच्या कुटुंबीयांना व गावकरी मंडळींना सार्थ अभिमान आहे... अनिल पटारे सर(शिवमचे वडील)

Post a Comment

0 Comments