शिर्डी( प्रतिनिधी)
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण अति उत्साही असून थर्टी फर्स्ट ची तयारी अनेकांनी केली आहे.
थर्टी फर्स्ट साठी शिर्डी परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट ,ढाबे, बार यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी आपापले हॉटेल, रेस्टॉरंट बुक करून ठेवल्याचेही बोलले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मोठी तयारी सुरू झाली आहे. अनेकांनी वेगवेगळे प्लॅन करत थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे ठरवले असून त्याप्रमाणे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी रजा टाकल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी जण पर्यटन स्थळी, तीर्थस्थळी जाऊन थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा बेत आखत आहे. थर्टी फर्स्ट शिर्डीत साजरे करण्यासाठी व साई दर्शनाने नवीन वर्षाचे स्वागत व्हावे म्हणून लाखोंच्या संख्येने साईभक्त शिर्डीत आले आहेत. सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आकर्षक अशी विद्युत रोषणाई घरांवर, इमारतींवर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. थर्टी फर्स्टमुळे ओल्या पार्ट्यांना सुकाळ आला आहे.
थर्टी फर्स्ट साजरी करताना शांततेचा भंग होऊ नये. कोणालाही त्रास होऊ नये म्हणून प्रत्येकाने दक्षता घ्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. कुठेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी प्रत्येकाने आनंदाने मात्र शांततेने थर्टी फर्स्ट साजरी करावी. कुठेही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा कडक कारवाई केली जाईल .असेही पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे. एकूणच सर्वत्र थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाच्या स्वागताचा माहोल दिसून येत आहे.
0 Comments