शिर्डी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री बारा वाजेच्या दरम्यान शिर्डीला साई मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत सौ शालिनीताई विखे पाटील होत्या. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई भक्तांची साई दर्शनाला मोठी गर्दी झाली आहे.
त्यामुळे 31 डिसेंबरला रात्रभर श्री साई मंदिर साई भक्तांसाठी दर्शनाला खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे रात्रभर साई भक्त दर्शन घेत होते.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सौ शालिनीताई विखे पाटील यांनी रात्री ठीक बारा वाजेच्या दरम्यान श्री साई मंदिरात जाऊन श्री साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके ,तसेच संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, याचबरोबर शिर्डीतील मा. विश्वस्त सचिन तांबे, तुषार गोंदकर, आदींसह विविध ग्रामस्थ, साई भक्त यावेळी उपस्थित होते. साई दर्शनानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे नवीन वर्ष राज्यातील सर्वांना सुख समृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे जावो असे साई चरणी प्रार्थना केल्याचे सांगितले.
0 Comments