शिर्डी (प्रतिनिधी) सद्गुरु गंगागिरी महाराज यांची 122 वी पुण्यतिथी नुकतीच मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने सरला बेट सह विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. सद्गुरु गंगागिरी महाराज हे मोठे संत होते.महाराजांच्या कार्यामुळे समाजात मोठे परिवर्तन घडले. त्यांचे कार्य आज संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारे आहे. बहुजन समाजाला महाराजांच्या कीर्तन-प्रवचनातून सन्मार्गाचे धडे मिळू लागले.
साधुसंतांची जीवनचरित्रे ऐकायला मिळत होती. महाराजांच्या उपदेशाने प्रेरित होऊन सामान्य लोकांनादेखील सदाचार आणि सद्व्यवहार आवडू लागला होता. विशेष म्हणजे गावोगावी भक्तिमार्गाचा प्रवाह वाहू लागला. प्रत्येक गावात भजनी मंडळे स्थापन झाली. या निमित्ताने दुरून साधुसंत आणि इतर लोक एकत्र जमत. त्यांच्या एकमेकाशी ओळखी होत. सप्ताह करणार्या गावकर्यांना फार मोठे कार्य सांघिक रितीने करण्याचा प्रत्यक्ष धडा मिळत असे. सहकार्यात फार मोठी शक्ती आहे, ही शिकवण महाराजांनी भक्तांना दिली. सप्ताह ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्त एकत्र येत. त्यामुळे एकमेकांच्या चालीरिती, व्यवहारज्ञान, शेतीतंत्रे यांची माहिती मिळे. महाराजांकडून संकुचित वृत्तीच्या लोकांना ‘वसुधैव कुटुंबकम्’चे शिक्षण दिले जात होते. त्यांनी हे विश्वचि माझे घर ही शिकवण देऊन लोकांची मने आणि हृदये विकसित केली. सहिष्णुता, दया, क्षमा, परोपकार, समदृष्टी या मानवी मूल्यांची जोपासना करण्याकरिता स्वत: आचरण करून लोकांना प्रेरणा दिली. असे अनेक सप्ताह करून विश्वास, सुख, शांती आणि समाधानाचा महामंत्र दिला.
संत गंगागिरीजी महाराजांनी आजन्म ब्रह्मचारी राहून संन्यासधर्माचे काटेकोर पालन केले. त्यांचे अनेक शिष्य होते. सर्व जाती, पंथ आणि संप्रदायातील लोक त्यांच्या विचाराने प्रभावित होते. त्यामुळे सर्वच त्यांच्याकडे येत होते. तेदेखील सर्वांना भेदभावाच्या भिंती पाडून एकसमान वागणूक देत असत. अठराव्या शतकात चारही वर्णांच्या लोकांना एका पंगतीत बसवून जेवण करायला लावणे इतके सोपे नव्हते. तेही कार्य त्यांनी केले. त्यांच्या सहवासात आलेल्या शिष्यांना त्यांनी शिक्षा-दीक्षा दिल्या. त्यांनी अनेक साधक घडविले. त्यांना संजीवनी (जिवंत) समाधी घेण्याची इच्छा होती. परंतु भगवंताच्या आदेशाने त्यांनी ते रद्द केले. पुढे ते आपल्या आयुष्याच्या 88व्या वर्षी शके 1824 (सन 1902)मध्ये श्रीक्षेत्र सराला बेट येथे समाधिस्थ झाले. त्यांचे मुख्य शिष्य सद्गुरू श्रीदत्तगिरी महाराज यांनी हे कार्य अव्याहतपणे चालू ठेवले. त्यांच्यानंतर सद्गुरू श्रीनाथगिरी महाराज, सद्गुरू श्रीसोमेश्वरगिरी महाराज, सद्गुरू श्रीनारायणगिरी महाराज या महापुरुषांनी परंपरा चालविली. शके 1931 (सन 2009)पासून हे परंपरागत समाजोद्धाराचे सेवा कार्य श्रीगुरू महंत स्वामी श्रीरामगिरी महाराज नि:स्वार्थी भावनेने करीत आहे.
त्यांनी ज्या हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली.इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगना वरी ! या अभंग उक्तीप्रमाणे सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी हरिनाम सप्ताह सुरू केला. हरिनाम सप्ताह चा स्वरूप छोटेसे होते मात्र ते आज खूपच विराट असे झाले आहे.
सरला बेट या महान तिर्थक्षेत्राची निर्मिती करुन शिर्डीचे साईबाबांना त्या काळात समाज देत असलेल्या त्रासाला बघून साईबाबा हे महान विभूती असलेल्याचे त्यांनीच त्या काळात ओळखून समाजाला सांगितले होते. आज आळंदी येथे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे किर्तनकार घडतात.अशा जोग महाराज यांना अनूग्रह त्यांनीच दिला होता. आणि असे हे जोग महाराज महिना महिना सरला बेटात रहात असे.सदगुरु गंगागीरी महाराज हे एकादशीच्या पुणतांबा वारी करत असे आणि अशा वारीच्या यात्रेत एकदा तमाशातील तुकाराम नावाचा तरुण जो तमाशाच्या आरंभी सुमधुर अशा आवाजात गणगवळण म्हणतो असं समजल्यावर या आवाजाचा वापर परमार्थात कर असे सांगितले व तेच खेडलं झुंगेचे तुकाराम महाराज होय. अशाप्रकारे गोदावरीच्या किनारी असलेल्या खेडलं झुंगे संस्थानाच्या ब्रम्हलिन तुकाराम महाराज यांनाही अनुग्रह देणारे सद्गुरु गंगागिरी महाराजच होते.अशा गंगागीरी महाराज यांनी लेने को हरीनाम,देणे को अन्नदान,डूबने को अभिमान और तैरने को विनता* अशा सुरू केलेल्या नाम सप्हाहाची गिनीज बुकाने नोंद घेतली असून आज सराला बेट देखील एक महान असे तिर्थक्षेत्र झालेले आहे.
सद्गुरु गंगागिरी महाराज यांची १२२ वी पुण्यतिथी नुकतेच साजरी करण्यात आली.
त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम असे ह भ प श्री संजयजी महाराज जगताप ( भऊरकर) यांनी म्हटले आहे.
0 Comments