बाळकृष्ण भोसले
राहुरी / प्रतिनिधी : राहुरी पोलीसांच्या ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे राबवित असलेल्या चोरीच्या दुचाकी शोध मोहीमेसाठीच्या विशेष मोहीमेचे तालुक्यातील जनतेतून कौतुक होत आहे. चार दिवसात जवळपास १७६ दुचाकी वाहनावर कारवाई केली असल्याचे पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले आहे.
राहुरी पोलिस स्टेशन हद्दीत बऱ्याचशा दुचाकी गाड्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशा माहितीवरून चौथ्या दिवशी राबविलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान ५८ दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली. पैकी ४९ वाहनांवर २७ हजार ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सदरची वाहने मालकाच्या ताब्यात परत नंबर प्लेट बसवून देण्यात आल्या.
उर्वरित नऊ दुचाकींची कागदपत्रे अद्याप पर्यंत मालकांनी सादर न केल्याने सदर गाड्यांच्या मालकी हक्काबाबत खात्री करून पुढील कारवाई करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गीते, ठोंबरे, पोकॉ. सतीश कुराडे, अंकुश भोसले, नदीम शेख, जालिंदर धायगुडे होमगार्ड कर्मचारी यांच्या पथकाने केलेली आहे.
0 Comments