शिर्डीत रस्त्यावर उतरून दुकानदार, रिक्षावाल्यांना प्रबोधन करणारे पो. नि. रामकृष्ण कुंभार यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार साहेब यांनी रविवारी साई मंदिर परिसरात तसेच शिर्डीच्या मुख्य बाजारपेठेत आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन भाविकांच्या सुरक्षेच्या संदर्भात फेरी मारली.दुकानदार,रिक्षावाले एजंट यांना साईभक्तांच्या सुरक्षेबाबत सूचना केल्या तसेच  गर्दीचा फायदा घेऊन जर भाविकांची लूट केल्यास जबर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

प्रथमच शिर्डीतील एक अधिकारी अश्या प्रकारे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी  रस्त्यावर उतरून प्रबोधन करत असेल तर आपण देखील अश्या अधिकाऱ्याच्या मागे उभे राहणे गरजेचं आहे.याच कारणास्तव शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचा पोलीस स्टेशनला जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शिर्डीतील निलेशदादा कोते,सचिनभाऊ कोते,संजय कोतकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments