शिर्डीत साई भक्तांची प्रचंड गर्दी! मंदिर ,दर्शन रांगा ,साईप्रसादालय, व रस्त्यांवरही साई भक्तांची मंदियाळी! हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट हाउसफुल!सुरक्षेसाठी मोठा पोलीस फौज फाटा तैनात!

शिर्डी ( प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी मध्ये नाताळ सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई भक्तांची मंदियाळी दिसून येत असून लाखोच्या संख्येने साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. सर्वत्र साई नामाचा गजर ऐकू येत आहे. अनेक साई पालख्या ,हजारो पदयात्री शिर्डीत आले आहेत. शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी असून सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.
   शिर्डीत गेल्या गुरुवारपासून साई भक्तांची मोठी गर्दी वाढली आहे. शनिवार, रविवार सुट्ट्या तसेच नाताळ सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्ष च्या स्वागतासाठी देश-विदेशातून साईभक्त शिर्डीत येत असतात. यावर्षीही साईभक्त बस, रेल्वे, विमान, खाजगी प्रवासी वाहनाने शिर्डीत येत आहेत. शिर्डीत सर्वत्र हॉटेल ,लॉज ,संस्थांनचे निवासस्थाने, मंडप हाउसफुल झाले आहेत. साई संस्थांनने साई भक्तांसाठी  मोठी व्यवस्था केली आहे. नगर मनमाड रस्त्यावर वाहनांची अधून मधून वाहतूक कोंडी होत आहे. साईप्रसादालातही भोजन प्रसाद घेण्यासाठी साई भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे .त्याचप्रमाणे साई दर्शनासाठी नवीन दर्शन हॉल भरून बाहेर रांग लागत आहे. एकूणच शिर्डीत साई भक्तांची मोठी मंदीयाळी दिसून येत असून शिर्डी साई नामाने गजबजून गेली आहे. साई भक्तांच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित करावी व साई भक्तांना त्रास होऊ नये, साई भक्तांची लूट होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सर्व पोलीस यंत्रणा सज्ज केली आहे. स्वतः पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे रस्त्यावर उतरून रिक्षा चालक ,दुकानदार व  भाविकांना सुरक्षा संदर्भात सूचना देत आहेत. साई भक्तांकडून अधिक भाडे घेऊ नये, वाहनांमध्ये काही मौल्यवान वस्तू साई भक्तांच्या राहिल्या तर त्या पोलीस स्टेशनला किंवा संस्थान कडे जमा करावेत. रस्त्यावर गाड्या लावू नयेत. अशा सूचनाही ते देत आहेत.व जर साई भक्तांची लूट केल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचेही पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले आहे. शिर्डी मध्ये गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या नियंत्रणाखाली बारा सक्षम पोलीस अधिकारी, 210 होमगार्ड सह  सुमारे 450  पोलीस फोर्स फौजफाटा शिर्डीत तैनात करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments