शिर्डी (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजन्मभूमी नारायणगाव ते शिर्डी अशी सायकल वारी काढण्यात येते. यावर्षीही ही सायकलवारी नारायणगाव येथून शिर्डी येथे आले असता या सायकलवारीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
या सायकल वारीमध्ये सुमारे अडीचशे साई भक्तांनी सहभाग घेतला. त्यामध्ये युवक युवतीही होत्या. शिर्डीत ही सायकलवारी आल्यानंतर तिचे विजयराव कोते, मंगेशराव त्रिभुवन, यांनी या सायकलवारीचे व साई पालखीचे स्वागत केले. या सायकलवारीतील सर्व साई भक्तांना कोते कुटुंबांच्या वतीने साईप्रसाद महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे बक्षीसे वाटण्यात आली.व सत्कार करण्यात आला. पोपटी टी-शर्ट घातलेले हे सायकलवारीतील साईयात्री करू सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शिर्डीत आल्यानंतर सर्वांनी श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.
0 Comments