शिर्डी (प्रतिनिधी ) श्री साईचं नामस्मरण व साईंचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र अंगी आचरल्याने अडचणी नक्कीच दूर होतात. साईबाबांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या कुटुंबावर राहिला आहे. साईबाबांचा आशीर्वाद असाच कायम राहो ,अशी प्रार्थना साईचरणी केली असल्याचे सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानची आई सलमा खान यांनी शिर्डीत साईं दर्शनानंतर सांगितले.
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आघाडीचा अभिनेता सलमान खानचा नुकताच गुजरात राज्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. सलमानच्या वाढदिवसाला संपूर्ण कुटुंबियांसह अनेक नामांकित व्यक्तींनी, अभिनेत्यांनी तेथे उपस्थिती लावली होती. सलमान खानचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सलमान खानला भरपूर आयुष्य मिळो यासाठी त्याची आई सलमा खान आणि बहीण अलवीरा अग्निहोत्री यांच्या कुटुंबीयांनी शिर्डीला भेट दिली व साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
साईबाबांच्या दर्शनानंतर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सलमा खान यांच्यासह संपूर्ण कुटूंबियांचा शॉल, साई मूर्ती देवून सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, प्रशांत सूर्यवंशी, मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी, अरुण गायकवाड आदी उपस्थिती होते.
सलमा खान या साईभक्त असून नेहमी त्या दर्शनासाठी शिर्डीला येत असतात. साईबाबांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या कुटुंबियांनावर राहिला आहे,व साईबाबांचा आशीर्वाद असाच कायम राहो, अशी प्रार्थना सलमा खान यांनी साई चरणी यावेळी केली. तसेच सध्या सलमान खान हा त्याचा आगामी चित्रपट 'सिंकदर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट 2025ला ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. त्याला चांगले यश मिळू दे !असेही मनोमन त्यांनी साईचरणी साकडं घातलं.
0 Comments