शिर्डी (प्रतिनिधी)
समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यामध्ये देरडे शिवारामध्ये एका आयशर टेम्पो ने अचानक पेट घेतला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली .
मंगळवारी रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान एका आयशर टेम्पो ने अचानक समृद्धी महामार्गावर धावत असताना पेट घेतला व काही वेळातच संपूर्ण आयशर टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आयशर टेम्पोला आग लागल्यामुळे या रस्त्यावर एक ते दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अग्निशामक बंब तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र आयशर टेम्पो पूर्णतः अग्नीने जळून खाक झाला. मात्र या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. महामार्ग पोलीसही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
0 Comments