शिर्डी ( प्रतिनिधी )- दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र पुणतांब्यात गोदावरी नदीकाठी असलेल्या यज्ञेश्वरी मंदिराच्या लगत श्री.घृष्णेश्वर महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करून विटंबना करण्यात आली असून या घटनेमुळे तमाम हिंदू धार्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचे पुणतांब्यासह राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेले आहे. मंगळवारी पुणतांबा कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.सर्वत्र या प्रकराचा निषेध करण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेतील संशयितआरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.तो मनोरुग्ण आहे.अशी माहिती शिर्डीचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी दिली आहे. परंतु या घटनेची सखोल चौकशी व्हावी. अशी मागणी महंत रामगिरीजी महाराजांनी यावेळी केली.
दरम्यान घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच त्यांनी तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने,तसेच राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दिली.त्यानंतर पोलीस प्रशासन मोठ्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.यावेळी श्री घृणेश्वर मंदिर परिसरात पाहणी करून पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार श्वान पथकाला पाचरण करण्यात आले. पोलीस यंत्रणेकडून पुढील चौकशी सुरु आहे.असे असले तरीही पुणतांब्यात धार्मिक स्थळांच्या विटंबना करण्याचे सत्र थांबायचं नांव घेत नाही. मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी पुणतांबा रेल्वे स्थानकात शेजारील असलेल्या श्री.हनुमान मंदिराची देखील अशा पद्धतीने माथेफिरू व्यक्तीने विटंबना केली होती.ते प्रकरण कुठेतरी शांत होत नाही तोच शनिवार दि.२३ डिसेंबर रोजी श्री घृणेश्वर महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची विटंबना झाल्याने समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे.या घटनेने पंचक्रोशीतील धार्मिक वातावरण ढवळून निघालेले आहे. परिसरामध्ये सध्याला तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेच्या पार्श्वभूमीवर आशा केंद्र चौक या ठिकाणी रास्ता रोको करून तीव्र निषेध सभा घेण्यात आली.गावातील आठवडे बाजारसह बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.सदरची घटना निंदनीय असून श्री.घृणेश्वर महादेव मंदिरातील धार्मिक स्थळाची विटंबना करणारा अज्ञात व्यक्ती कोण ? याची पोलीस प्रशासनाने तात्काळ सखोल चौकशी करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पुणतांबा ग्रामस्थांनी केलेली आहे.दरम्यान या घटने संदर्भात पोलीसांनी तात्काळ चक्रे फिरवली.आरोपीला पकडले असून अधिक चौकशी सुरू आहे.तसेच गांवकरी , भाविक यांनी शांतता राखावी,असे आवाहन शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी केले आहे. दरम्यान यासंदर्भात पुणतांबा येथे गुरुवारी ग्रामसभा होणार असल्याचे समजते. असे प्रकार त्वरित थांबवावे व त्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी भाविकांनी केली आहे.
0 Comments