शिर्डी जवळील साई पालखी निवाऱ्यात महाराष्ट्र मंदिर न्यास महासंघाची परिषद उत्साहात सुरू!

शिर्डी( प्रतिनिधी)
सरकारने भारतातील अन्य धर्मांची प्रार्थना स्थळे ताब्यात घेतलेली नाही. मात्र हिंदूंचीच मंदिरे सरकारच्या ताब्यात का? आता हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावीत. अशी मागणी सद्गुरू गंगागिरी महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी केली आहे.

शिर्डी जवळील साई पालखी निवाऱ्यामध्ये महाराष्ट्र मंदिर परिषद भरवण्यात आली असून तिचा प्रारंभ विविध साधू संत व विविध देवस्थानच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी कोपरगाव बेटातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिराचे परमपूज्य रमेश गिरीजी महाराज ,कोपरगाव येथील श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य राघवेश्वरानंद गिरीजी महाराज सनातन संस्थेचे सद्गुरु सत्यवान कदम, मुंबई येथील समस्त महाजन संघाचे अध्यक्ष गिरीश शहा, श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष श्री प्रदीप तेंडोंलकर ,मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट आदी मान्यवरांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले. या परिषदेसाठी महाराष्ट्रातील सुमारे 750 विविध देवस्थानचे विश्वस्त प्रतिनिधी, अभ्यासक उपस्थित आहेत. 
यावेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रम्ह डॉक्टर आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले.तर या मंदिर न्यास महासंघाच्या कार्यात्मक आढावा महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी मांडला.
यावेळी सुनील घनवट म्हणाले की, मंदिरे सरकार मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.
तर यावेळी प्रदीप तेंडोंलकर म्हणाले की ,मंदिराचे संवर्धन हे भगवंताचे कार्य आहे .त्यामुळे या कार्यासाठी ईश्वरनेच आपणाला एकत्र आणले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मागील तीन वर्षे झालेली कार्य निश्चितच उल्लेखनीय आहेत .या परिषदेच्या माध्यमातून सर्व विश्वस्तांना हे स्थानिक व्यासपीठ प्राप्त झाले आहे.यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपण मंदिरांच्या सभागृहांना यापूर्वी मदत केली असून यापुढेही मदत करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त तसेच विघ्नहर देवस्थान त्याचप्रमाणे राज्यातील इतर देवस्थानचे विश्वस्त, प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments