शिर्डी( प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीमध्ये किंग मेकर ठरलेले डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचा वाढदिवस २४ नोव्हेंबर 2024 रोजी लोणी येथील जनसेवा कार्यालयात नुकताच मोठा उत्साहात साजरा झाला. यावेळी हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी हितचिंतकांनी येथे येऊन त्यांना पुष्पगुच्छ , गुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे नामदार राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाल्याबद्दल व अ,नगर जिल्ह्यामध्ये महायुतीला यश मिळाल्याबद्दल यावेळी डॉक्टर सुजय दादा विखे पा.यांचे अभिनंदन करण्यात आले.
टायगर अभी जिंदा है चा नारा कार्यकर्ते वारंवार लावत होते. शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी रांग लागली होती. शिर्डी मतदार संघातील प्रत्येक गावातून येथे कार्यकर्ते आले होते. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने विविध मतदारसंघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी येथे डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे दिसून येत होते.
यावेळी डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये यावर्षी वाढदिवसाला विधानसभेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महायुतीला मोठा जनतेने कौल दिला हीच सर्वात मोठी भेट आहे. जनतेने महायुतीवर विश्वास ठेवला व जिल्ह्यामध्ये महायुतीच्या दहा जागा निवडून आल्या, खरं पाहिलं तर बारा झिरो व्हायला पाहिजे होत्या .मात्र एक जागा राम शिंदे यांची थोड्या मताने गेली. आपल्या सर्वे प्रमाणे येथे किमान पाच हजाराचं लीडने शिंदे येणे गरजेचे होते. मात्र थोडेफार इकडे तिकडे होत असतं मात्र ते शैल्य मनात आहे असं सांगत, श्रीरामपूरला महायुतीच्या काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही. कालांतराने कोण काय केलं यावरून त्यांच्यावर कारवाई करू, असे म्हणत संगमनेरला जनसेवा कार्यालय सुरू करणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, सरकार आपलं आहे, त्यामुळे तहसील कार्यालय ,प्रांत कार्यालय हे आपल्याच सरकारचे आहे .तेथे आमदार बसू शकतो बस स्टैंड वरही बसू शकतो. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी बसण्या उठण्याचे ठिकाणच जनसंपर्क कार्यालय राहील. असे त्यांनी हसतच सांगत राजकारण ही एक प्रक्रिया असते, प्रचार केला ,प्रयत्न केला, त्यामुळे संगमनेर मध्ये यश मिळाले. त्यांनीही राज्य देशाचे नेते बोलावले होते मात्र मतदारांचे मत हे अगोदरच फिक्स असतात.
आता प्रचारात सांगितल्याप्रमाणे साकुर पठार भागाला पाणी आणण्याचे काम नक्कीच आपण करणार आहोत. असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे उपस्थित होते.
0 Comments