लोहगाव (कोडीराम नेहे)
गेल्या ४० वर्षांपासून संगमनेरचे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब थोरातांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केलाय. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणाऱ्या अमोल खताळ यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट स्पेशल विमान पाठविले असून ते माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सोबत ते मुंबईला रवाना झाले आहेत.
संगमनेरमध्ये नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच यावेळी सुजय विखे यांचा वाढदिवस सोहळा मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुजय विखे देखील उपस्थित होते. या दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना सुजय विखे पा. यांनी ही माहिती दिली. नवनिर्वाचित आमदार व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी संगमनेरच्या सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे यावेळी आभार मानले. यावेळी नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचा आज रविवारी वाढदिवस असल्यामुळे येथेही त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मतदार उपस्थित होते.
0 Comments