टाकळीभान (प्रतिनिधी )
येथील पनियल प्रार्थना भवन येथे डायबिटीस मुक्त भारत अभियान अंतर्गत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी जपानीज मशीन द्वारे ३७ प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा ७० शिबिरार्थींनी लाभ घेतला. याप्रसंगी प्रार्थना भवनात सर्वांच्या उत्तम आरोग्याची प्रार्थना करण्यात आली. यावेळी शिबिर लाभार्थी व नागरिक उपस्थित होते. या शिबिरासाठी पास्टर किशोर बनकर, किशोर साबळे, डॉ. शिवाजी पाटील, शिवाजी जाधव यांनी शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
0 Comments