वरवंडी(प्रतिनिधी) उत्तर अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे अक्षरशः पानिपत झाले असून जिल्ह्याचे दिग्गज नेते तथा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाच्या दावेदार बाळासाहेब थोरात यांना धक्कादायक पराभवचा सामना करावा लागला माजी खा.डॉ.सुजय विखे संगमनेरचे किंगमेकर ठरले असून शिवसेना शिंदे गटाचे नवखे उमेदवार अमोल खताळ यांनी विजय खेचून आणत थोरातांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय सत्तेला सुरुंग लावला अमोल खताळ यांनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवून विजय खेचून आणल्याचा जल्लोष वरवंडीत उत्साही वातावरणात साजरा झाला.
पठार भागातील वरवंडी हे गाव नेहमी राधाकृष्ण विखे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. प्रामुख्याने पठार भाग हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जातो परंतु या गावातील कार्यकर्त्यांनी पठार भागात गावागावात भेटी देऊन परिवर्तन घडवून आणल्याचे बोलले जातेय शिवसेनेचे उबाठा गटाचे गुलाब भोसले व बाबासाहेब कुटे यांना देखील भाजपात पक्ष प्रवेश घेण्यामागे वरवंडीतील संतोष वर्पे सुभाष गागरे यांचा सिंहाचा वाटा आहे अमोल खताळ यांना विजय प्राप्त झाल्यावर वरवंडीत एकच जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments