राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच शैक्षणिक ज्ञानही समाजाला दिले--ह भ प संजयजी महाराज जगताप

कोपरगाव ( प्रतिनिधी)आपली भूमी ही संतांची भूमी असून ते  आपल्या सर्वांचे भाग्य आहे. अशा संतांच्या या भूमीत तालुक्यातील दहेगावी म्हाळसा मातेच्या उदरी 110 वर्षांपूर्वी ललित पंचमीच्या दिवशी राष्ट्रसंत  प.पू. जनार्दन स्वामी जन्माला आले होते. धन्य तो देश ,धन्य ते कुळ, जिथे हरीचे दास जन्म घेते! त्यामुळेच हा सर्व परिसर मोठा पुण्यवान आहे. असे मत प्रसिद्ध कीर्तनकार हभप संजयजी महाराज जगताप (भऊरकर)यांनी एका पत्रकातून व्यक्त केले.  त्यांनी पुढे म्हटले की,जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती!! संत हे जगाच्या उद्धारासाठी जगाच्या कल्याणासाठी जन्माला येतात. अवतार घेतात. व प्रत्येकाला अध्यात्मिक मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत परमपूज्य संत जनार्दन स्वामींनी अनेकांना अध्यात्मिक मार्गावर आणले. भक्ती उपासनेचा मार्ग दाखवला. त्यांनी अध्यात्माच्या जोडीला शिक्षणालाही महत्त्व दिले.


  एकदा त्यांच्याकडे शैक्षणिक सहल आलेली असताना त्यांनी संबंधित शिक्षकांना विचारले. यात सर्वच शहरी विद्यार्थी दिसतात .गोरगरीब खेड्या पाड्यातील विद्यार्थी का नाहीत? शिक्षकांनी त्यांना सांगितले की, महाराज खेड्या पाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे म्हटले की, त्यांना मोठमोठ्या शहरांमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. तेथे राहणे खाणं पिणं या सर्व आर्थिक बाबींची त्यांच्याकडून पुर्तता होणं  अवघड होतं. त्यामुळे त्यांनी तात्काळ छ.संभाजीनगर येथे शिक्षणाबरोबरच राहण्यासाठी वसतीग‌हाची उभारणीसाठी मुहूर्तमेढ रोवून राज्यात जागोजागी शाळा कॉलेजच्या उभारणी केलेल्या आहेत.
 जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले! तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा!! अशाप्रकारे त्यांनी अध्यात्मिक, शैक्षणिक, व वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींनी त्रस्त असलेल्या अनेकांची त्यांनी सेवाच केलेली आहे. असे ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी म्हटले आहे.
 राष्ट्रसंत प.पू.जनार्दन स्वामी यांची ११० वी जयंती सोमवार दिनांक सात ऑक्टोबर 2024 रोजी कोपरगाव  बेट येथे त्यांच्या समाधीस्थळी  साजरी झाली.  त्यानिमित्ताने ह भ प श्री संजयजी महाराज यांनी प.पू.जनार्दन स्वामी यांचे समाधीस्थळी कोपरगावबेट येथे जावून दर्शन घेतले. मठाधिपती परमश्रद्धेय गुरुवर्य रमेशगीरी महाराज यांची भेट  घेतली. यावेळी गुरुवर्य रमेश गिरीजी महाराज यांनी ह भ प श्री संजयजी महाराज यांचे आदारातिथ्य करून त्यांचे स्वागत केले. संत जनार्दन स्वामी यांची जयंती निमित्ताने येथे मंडप, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तसेच विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हजारो भाविकांनी येथे येऊन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे मनोभावे दर्शन घेतले.

Post a Comment

0 Comments