शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे भक्तांच्या संख्येत वाढ होऊन राज्यातील पर्यटन विकासालाही चालना मिळेल. तसेच रोजगाराचे संधी वाढतील, कृषीमाल देश-विदेशात निर्यात करता येईल. त्यामुळे शिर्डी व परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. असे प्रतिपादन पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी यांनी केले. तर यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिर्डीला साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय महत्त्व आले असून भक्तांच्या सेवेसाठी ही नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत उभे राहणार आहे. त्यामुळे भक्तांना तसेच कार्गो सेवा उभारली जात असल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे .असे मत यावेळी दूरदृश्य प्रणाली द्वारे व्यक्त केले.
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 645 कोटी खर्चाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून दूरदृश्य (आभासी) प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या भूमिपूजन कार्यक्रमात सहभाग घेतला.व मार्गदर्शन केले.
या विमानतळ टर्मिनल भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी येथे राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर, शिर्डी विमानतळ संचालक गौरव उपश्याम आदी उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथून या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टी प्रणाली द्वारे बोलताना पुढे म्हणाले की, शिर्डीच्या या विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे साईभक्तांना, प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यामुळे विमानांची संख्या वाढून भक्तांची येणे जाण्याची संख्याही वाढणार आहे.शिर्डी, शनिशिंगणापूर भक्तांच्या संख्येत वाढ होऊन राज्यातील धार्मिक पर्यटन विकासाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. कार्गो कॉम्प्लेक्समुळे शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर व नाशिक परिसरातील कांदा, द्राक्ष, शेवगा, पेरू व डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचा कृषी माल देश - विदेशात निर्यात होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल.असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बोलताना सांगितले.
तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी रायगड येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या भूमिपूजन उद्घाटन समारंभाला व उपस्थितांना संबंधोतना म्हटले की, शिर्डीला श्री साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय महत्त्व आले आहे. शिर्डीला मोठ्या संख्येने फक्त येत असतात. साईबाबांच्या भक्तांच्या सेवेसाठी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत साकारत आहे. या इमारतीची अंदाजित किंमत ६४५ कोटी रूपये आहे. केंद्र सरकारने हा निधी दिला असून महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासन नेहमीच मदत करते. या नवीन टर्मिनल मुळे शिर्डी परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहेच पण ५५ कोटी खर्चून शिर्डी विमानतळावर कार्गो सेवा उभारली जात आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. येथील आसपासच्या शेतकऱ्यांचा माल देशात प्रदेशात निर्यात होऊन भावही चांगला मिळेल. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. असे ते यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूर येथून दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेत कार्यक्रमात दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून बोलताना सांगितले,की, शिर्डी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लॅंडिंग सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे विमानांची संख्या वाढणार आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे शिर्डी शहर जगाच्या नकाशावर येणार आहे. येत्या काळात येथे येणाऱ्या साईभक्तांमुळे शिर्डी हे भारतातील सर्वांत जास्त प्रवाशांनी गजबजलेले विमानतळ ठरणार आहे. गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शिर्डी कार्यक्रमात लवकरच शिर्डी विमानतळाच्या या नवीन टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन करण्यात येईल असे सांगितले होते व हे टर्मिनलचे भूमिपूजन आज होत आहे. असे ते या वेळी म्हणाले.
यावेळी प्रत्यक्ष कार्यक्रमात उपस्थित असणारे राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,, शिर्डी विमानतळ हे सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचे आर्थिक विकासाचे मुख्य केंद्र म्हणून ते नावारूपाला येणार आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळामुळे शिर्डी एमआयडीसीतील उद्योगांना चालना मिळणार आहे. आजपासून शिर्डी विमानतळाचे नाव 'साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट' असे नामकरण करण्यात आले आहे, असे सांगत येथे टर्मिनल इमारतीची जागा कमी पडत असल्याने नवीन टर्मिनल इमारत येथे होत आहे त्यासाठी 645 कोटी निधी केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे लवकरच शिर्डी विमानतळ हे जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे त्यास स्वरूप प्राप्त होत आहे. याचा आनंद आहे. येथे मलेशियन व आकाशा एअरलाइन्स विमाने सुरू करण्यास उत्सुक असून येथे देशांतर्गत विमान सेवा ही मोठ्या प्रमाणात यापुढे सुरू होईल व त्याचा साईभक्त, प्रवासी व जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार आहे. असे यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला विमानतळ अधिकारी व कार्यकर्तेही , काकडी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments