टाकळीभान ( वार्ताहर ) राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक यांनी काल मंगळवारी टाकळीभान टेलटँकला ( गोविंद सागर ) अचानक सदिच्छा भेट देवुन भिंतिवर वाढलेले झाड, गेटची झालेली पडझड व धरणात वाढलेला गाळ याबाबत चिंता व्यक्त करीत गोविंद सागरच्या देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव द्या त्यासाठी प्रयत्न केले जातील असे मत व्यक्त केले.
यावेळी खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थाचे सहसचिव अँड. जयंत चौधरी, प्रशांत खंडागळे, नितीन गवारे, .देवदास कोकणे ,माजी प्राचार्य श्री जयकर मगर सर, श्री. प्रसन्न शेटे, किरणराव धुमाळ, श्रीधर गाडे , संदीप कापसे, अर्बन बँकेचे माजी, ब्रांच मॅनेजर दत्तात्रय लोखंडे, सुजित कापसे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे,आदी उपस्थित होते
माजी मंञी दिवंगत गोविंदराव आदिक यांनी १९७२ साली दुरदृष्टीचा निर्णय घेवुन दुष्काळी परीस्थितील परीसरातील नागरीकांना हाताला काम देण्यासाठी टाकळीभानच्या माळरानावर टेलटँकची मुहुर्तमेढ रोवली होती. अनेक समस्यांवर मात करीत त्यांनी टेलटँकचे काम पुर्ण करुन घेतल्याने परासराला हा टेलटँक वरदान ठरल्याने परीसर सुजलाम सुफलाम झालेला आहे. नुकतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदीक यांनी टेलटँकला सदिच्छा भेट देवुन दिवंगत गोविंदराव आदीक यांच्या दुरदृष्टीच्या केलेल्या कामांना उजाळा दिला. यावेळी टेलटँकच्या भिंतीवर वाढलेली झाडे भिंतीला धोका पोहचु शकतात तर मेन गेटची होत आसलेली पडाझड, भिंतीच्या दगडी पिचिंगचे निखळलेले दगड, जलाशयात वाढलेला याबाबत जललसंपदा विभागाचे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आसल्याने आदीक यांनी चिंता व्यक्त करीत देखभाल दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार करुन द्या निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करतो आसे आश्वासन उपस्थित कार्यकर्त्यांना दिले. यावेळी टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने आदीक यांचा सत्कार करण्यात आला..
0 Comments