दिलीप शिंदे
सोयगाव, दि. ०९ --- क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासोबतच भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपण्याच्या उद्देशाने भैरवनाथ महाराज क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डी मैदानावर पूजन व भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कबड्डीच्या मैदानाभोवती आकर्षक पद्धतीने पणत्या लावून संपूर्ण मैदान दीपप्रकाशाने उजळविण्यात आले. शेकडो पणत्यांच्या लखलखत्या प्रकाशाने मैदानाला जणू दीपमाळेचे स्वरूप प्राप्त झाले होते.कबड्डी मैदानाच्या पूजनानिमित्त आयोजित या दीपोत्सवाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मैदानाच्या चोहोबाजूंनी आणि विविध टप्प्यांवर नियोजनबद्ध पद्धतीने पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. मध्यभागी पूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रकाशमान पणत्यांच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले मंडळाचे पदाधिकारी व कबड्डीपटू यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते..
यावेळी भैरवनाथ महाराज क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संदीप सुरडकर, उपाध्यक्ष राजू दुतोंडे, मंगेश सोहनी, कबड्डीपटू प्रा. डॉ. कमलेश काळे, मंडळाचे आधारस्तंभ दिनेश पंडित, सचिव महेश मानकर, विनोद वामने, महेश दुसाने, सचिन सोहनी, सागर कोकाटे, मोहन आगे, कृष्णा गोतमारे यांच्यासह मंडळाचे सर्व खेळाडू व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments