हैदराबाद येथील साई भक्तांनी दहा लाख 14 हजार रुपये किंमतीचे आकर्षक सोन्याचे ब्रांच व चांदीचे‌ एक ताट व तीन वाट्या साईचरणी केल्या अर्पण!

शिर्डी( राजकुमार गडकरी)-
 श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध स्वरूपात देणगी अर्पण करीत असतात.
याच श्रद्धाभावातून तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील साईभक्त श्री. जी. एस. एस. साई, श्रीमती वेंकटा सुभालक्ष्मी व परिवार यांनी दीपावली पर्वाच्या निमित्ताने श्री साईबाबांच्या चरणी ६७ ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम केलेले सोन्याचे ब्रॉच तसेच ७४९ ग्रॅम वजनाचे चांदीचे १ ताट व ३ वाट्या भक्तिभावाने अर्पण केल्या. या दोन्हीचे एकत्रित देणगी मूल्य रुपये १० लाख १४ हजार ३४३ इतके आहे..
सदर देणगी स्वीकारल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला. व या साईभक्तांवर श्री साईबाबांची कृपा अशीच राहो अशी प्रार्थना केली.

Post a Comment

0 Comments