शिर्डी (राजकुमार गडकरी )-
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था संचलित श्री साईनाथ रुग्णालयातील ‘केस पेपर व मेडिकल रेकॉर्ड इमारती’चा उद्घाटन व लोकार्पण समारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहिल्यानगर तथा साई संस्थांनचे तदर्थ समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजी कचरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडिलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे, कार्यकारी अभियंता श्री. भिकन दाभाडे, प्रभारी वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, प्रभारी उपकार्यकारी अभियंता (बांधकाम) श्री. गणेश कोराटे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मैथिली पितांबरे आदी उपस्थित होते. तसेच बांधकाम कंत्राटदार मे. अजित कुमार जैन, गोंदिया आणि वास्तुरचना व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे. राजेंद्र गट्टानी अँड असोसिएट्स, अमरावती यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
श्री साईनाथ रुग्णालयात रुग्णांना अधिक सुलभ व सुव्यवस्थित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या इमारतीचा उपयोग होणार आहे. या सुविधेमुळे रुग्णांच्या केस पेपर व वैद्यकीय नोंदींचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि सुसूत्र होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments