सोयगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले,सुदैवाने जीवित हानी टोळली!, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष -------






दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१९ --सोयगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बैठक हॉलमध्ये दि.१९ सोमवारी दुष्काळग्रस्त पंचनामांच्या आढावा बैठक घेण्यात आली होती. यादरम्यान बैठक हॉल समोरील छताचे प्लास्टर कोसळले सर्व कर्मचारी बैठक हॉलमध्ये असल्याने सुदैवाने जीवित हानी टळली.

 यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. छताचे प्लास्टर कोसळण्याची परंपरा कायम सुरू असल्याने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हस्तांतरणापूर्वीच मोठमोठे तडे पडलेले आहे. तिसऱ्या वेळेस छताचे प्लॅस्टर कोसळले आहे. इमारतीचा वापर न होता इमारतीची डाग डुजीवर वेळ आल्याने इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. 
 सोयगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ७५१.८९ लक्ष रुपये इतका भरमसाठ निधी मंजूर करण्यात आला होता. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम युनायटेड कन्स्ट्रक्शन छत्रपती संभाजीनगर यांनी केले असून हस्तांतरित करण्यापूर्वीच इमारतीला मोठमोठे तडे पडले असून छताचे प्लास्टर ही कोसळल्याचा धक्कादायक प्रकार दि.१८ सप्टेंबर रोजी समोर आला होता. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी बैठक सुरू झाल्यानंतर शेताचे प्लास्टर कोसळले.भरघोस निधी असतांना देखील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या झालेल्या बांधकामाबाबत कनिष्ठ अभियंता यांनी मोजमाप पुस्तिकेत कामाची नोंद करण्यासाठी प्रत्य क्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे का? मोजमाप पुस्तिकेतील नोंदीची पडताळणी उपविभागीय अभियंता यांनी केली आहे का? मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम ठरवून दिलेल्या दर्जा नुसार झाल्याचे प्रमाणपत्र गुणवत्ता नियंत्रण विभागाने कसे दिले यावर प्रश्न उभे राहिले आहेत. 
      सार्वजनिक बांधकाम विभाग फर्दापूर यांच्या देखरेखीखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सुरुवातीपासूनच या इमारतीच्या बांधकामाविषयी निकृष्ट गरजेचे काम होत असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. मात्र येथे दारावर राजकीय वरच हातामुळे कार्यकारी अभियंता उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी उत्सुक पुरस्कार दुर्लक्ष केल्याने वाळूचा वापर न करता ठेकेदाराकडून खडीचा बारीक फफुट्याचा वापर करण्यात आला आहे.यामुळे इमारतीला मोठमोठे तडे गेले असून काही ठिकाणी छताचे प्लास्टर कोसळत आहे.सीलिंग देखील पडण्याच्या मार्गावर आहे.इमारतीची डागडुजी करण्यात आली असतांना पुन्हा छताचे प्लास्टर कोसळले असून खिडक्यांजवळ मोठ मोठे तडे गेले आहे यामुळे प्रशासकीय इमारतीच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात उपविभागीय अभियंता ब्रह्मानंद तायडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कनिष्ठ अभियंता दराडे यांच्याशी संपर्क साधावा असे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराकडून केंव्हा डागडुजी करून घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव)

Post a Comment

0 Comments