दिलीप शिंदे
सोयगाव, दि. १४ -- सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे ७० वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त सामूहिक पुष्पहार अर्पण करून महामानवांना अभिवादन करण्यात आले.यावेळी श्रामणेर मुकुंदा वाहुळे, सखाराम इंगळे, आनंदा इंगळे, सोयगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक भारत तायडे, रवींद्र बिरारे, सुधाकर खरे, पंढरी इंगळे, रमेश चक्के, साहेबराव बिरारे, माजी सरपंच सुरेखा तायडे, माजी सदस्य सुशीला इंगळे, अनुसयाबाई सोनवणे, कविताबाई वाघ, वंदनाबाई वाघ, लक्ष्मीबाई सोनवणे, निर्मलाबाई बिरारे, नंदाबाई खरे, शारदा सोनवणे, पंचशीलाबाई, मायाबाई बिरारे, माही सोनवणे, स्विटी सोनवणे यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments