लोहगाव (वार्ताहर): प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत ना.स. कडू पाटील विद्यालय व बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सात्रळ येथील तनिष्का कडू व सृष्टी घागरे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
प्रवरानगर येथील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकत्याच आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम पाटील, माजी प्राचार्य मधुकर अनाप यांच्या कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपपप्रज्वलाने झाले. यावेळी प्राचार्य माजी प्राचार्य अण्णासाहेब साबळे, कमलताई म्हस्के, स्मिता चेचरे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपप्राचार्य संजय डुबे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, संजय ठाकरे यांच्यासह स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य दिलीप डहाळे यांनी केले. यावेळी प्राचार्य मधुकर अनाप, सुहास वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून रावसाहेब म्हस्के यांनी सांगितले की, या स्पर्धेच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेसाठी योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींच्या कार्याचा आणि विचारांचा जागर होणार आहे. विद्यार्थ्यांनी उत्तम वाकचातुर्य आत्मसात करावे. या सांघिक वक्तृत्व स्पर्धेत दहा महाविद्यालयातील वीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरणाचे अध्यक्ष सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जनरल बॉडी सदस्य किरण कडू पाटील व सुधीर म्हस्के पाटील हे होते. या स्पर्धेत सात्रळ महाविद्यालयाने कृषी मंत्री डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ रावसाहेब म्हस्के पाटील यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या रुपये पाच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, स्व. शहाजी अनाप यांच्या स्मरणार्थ माजी प्राचार्य मधुकर अनाप यांच्यातर्फे देण्यात येणारा महात्मा गांधी फिरता चषक पटकावला तर थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ. पी.बी. कडू पाटील यांच्या स्मरणार्थ उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्यातर्फे देण्यात येणारा रुपये चार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थी समृद्धी डांगे व प्रभात दुरुंदे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. माजी आमदार चंद्रभानदादा घोगरे पाटील यांच्या स्मरणार्थ एकनाथ घोगरे पाटील यांच्यातर्फे देण्यात येणारा रुपये तीन हजार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी तनुजा भालेराव व संचिता मेटे यांनी प्राप्त केला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल चौधरी यांच्या वतीने उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये एक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रथम क्रमांक दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील विद्यार्थिनी आकांक्षा गांगर्डे, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, शिर्डी येथील विद्यार्थिनी दिपाली आहिरे तर उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथील अंजली चिखले यांनी प्राप्त केल. या स्पर्धेसाठी आदिनाथ जोशी व विनायक कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य संजय डुबे, स्पर्धा समन्वयक डॉ. शरद दुधाट, प्रतिभा पाटील, देवेश आहेर, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रेणुका वर्पे व शरयू खर्डीकर यांनी केले.
0 Comments