दिलीप शिंदे
सोयगाव दि.२६--- राज्यात प्रथम आलेल्या पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी या गावाची सोयगाव तालुक्यातील शिंदोळ येथील ग्रामस्थानी पहाणी केली. संपूर्ण आडाची वाडी गावाची पाहणी करीत घनकचरा व्यवस्थापन, गावातील स्वच्छता, सांड पाणी,गटारी स्वच्छता, सुसज्ज असे वाचनालय, व्यायाम शाळा समशान भूमी मधील अभ्यास केंद्र आदींची पाहणी केली.
यावेळी आडाची वाडी येथील गावकऱ्यांच्या मते इथे पदाला महत्व नाही गावाचा विकास व गावाला बक्षीस कसे मिळेल यासाठी सर्व गावकरी प्रयत्न करतात. स्वयंसेवी ज्यांनी सगळ्यांनी मिळून गावाला राज्यातून प्रथम क्रमांक मिळवून दिला अशी माहिती आडाची वाडी येथील सागर पवार , अरविंद पवार , सचिन पवार , दत्तात्रय पवार यांनी शिंदोळ येथील योगेश बोरसे, दत्तू पाटील व त्यांच्या सोबत असलेल्या ग्रामस्थांना दिली. आडाची वाडी या गावाचा झालेला विकास बघून शिंदोळ गावाचा विकास आडाची वाडी गावासारखा करायचा हा उदात्त हेतू मनात घेऊन योगेश बोरसे व शिष्ट मंडळ शिंदोळ गावी परतले यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
0 Comments