टाकळीभान: माऊली प्रतिष्ठान संचलित प्राईड अकॅडमी प्री स्कूल टाकळीभान येथे माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे व अकॅडमीच्या संचालिका माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राईड प्री स्कूल सुरू असून या स्कूलमध्ये आशियाई कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक विजेता टाकळीभानचा भूमिपुत्र भारतीय कबड्डी संघाचा स्टार खेळाडू असलम इनामदार याने प्राईड प्री स्कूल टाकळीभान येथे निमंत्रण स्वीकारून भेट दिली व येथील विद्यार्थ्यांशी हितगुज साधले असलम इनामदार याच्या उपस्थितीने चिमुकले विद्यार्थी भारावून गेले.
व या उत्कृष्ट राष्ट्रीय कबड्डी खेळाडू समवेत हितगुज करण्याची संधी मिळाल्याने त्यामुळे सर्व विद्यार्थी उत्साहित व प्रफुल्लित झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कबड्डी मॅच खेळा द्वारे असलम इनामदार यांचे स्वागत केले व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कबड्डी खेळाविषयी असणाऱ्या आकर्षण व आवडीचे असलम याने कौतुक केले. याप्रसंगी अशीयाई कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक विजेता असलम इनामदार याचा प्राईड अकॅडमी फ्री स्कूल टाकळीभान यांच्यावतीने प्राईड अकॅडमीच्या संचालिका माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे व सर्व शिक्षक स्टाफच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. असलमने सातासमुद्रापार जाऊन आशियाई कबड्डी स्पर्धेत भारत देशाचा विजयाचा झेंडा फडकविल्याने व या टाकळीभान मातृभूमीचे नाव जगात उज्वल केल्याने त्याचे भरभरून अभिनंदन व कौतुक करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार अर्जुन राऊत, क्रीडा प्रशिक्षक राहुल कोकणे, प्राचार्य जयश्री वाडेकर, शिक्षका ज्योती मिरीकर, निकिता शिरसाठ आदीसह शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते
0 Comments