दिलीप शिंदे
सोयगाव दि.०४--सिल्लोड कडून सोयगाव कडे येत असताना सोयगाव जवळील हळदा घाटात दुसऱ्या वळणा वरील खोल दरीत सात ते आठ फूट खोल पोलिसाची स्विफ्ट कार क्र- एम एच-२०,डी जे ०२५४ कोसळल्याची घटना दि.०३ शनिवारी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी घडली. कार दरीत कोसळताच दरीत झाडाच्या खोडाला अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान दहा ते पंधरा मिनिटे ही कार दरी आणि झाड यामध्ये अडकून होती.
परंतु पोलिस अनिल तांगडे व ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले त्यांनी मोठ्या धैर्याने त्यांना बाहेर काढले. सोयगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले भरत साहेबराब फरकाडे( वय ४२ वर्षे) असे गंभीर जखमी झालेल्या पोलिसांचे नाव आहे. भरत फरकाडे हे सिल्लोड कडून सोयगाव येत होते, परंतु अजिंठ्याच्या घाटात सकाळ पासूनच रहदारी ठप्प झाली असल्याने ते सोयगावकडे येण्यासाठी हळदा मार्गाने येत होते. घाटात दुसऱ्या वळण रस्त्यावर त्यांची स्वीफ्ट कार अचानक तोल घसरून घाटाच्या दरीत सात ते आठ फूट खोलवर कोसळली. नशीब बलवत्तर म्हणून त्यांची कार झाडाच्या खोडात अडकली अन दुर्घटना टळली. पोलीस शिपाई अनिल तांगडे यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे उपचारासाठी दाखल केले, त्यांना गुडघाला व खांद्याला गंभीर दुखापत झाली. वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेश खंदारे यांनी प्राथमिक उपचार करून तातडीने पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
0 Comments