माहूरगड, सप्तश्रुंगी गड,मनुदेवी येथून पायी ज्योत आणूुन शहरात मोठ्या उत्सवात दुर्गा मातेची घटस्थापना

  


दिलीप शिंदे
सोयगाव, दि. ११ - शहरातील दुर्गा उत्सव मंडळांनी माहूरगड सप्तशृंगी गड मनुदेवी आदी सुप्रसिद्ध देवी स्थळांहून अनेक दुर्गोत्सव मंडळांनी पायी ज्योत आणून रविवारी सायंकाळी शहराच्या बाहेरून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत ज्योत सह दुर्गा मातेची मूर्ती शहरात आणण्यात आल्या यावेळी शक्ती दुर्गा उत्सव मंडळाचे सदस्य ज्योत घेऊन आले.
 यावेळी भक्तांचे पद्मा शिंदे, मालता गव्हाणे, वैशाली हिरे,सुनिता गव्हाणे, दीप्ती पाटील, मनीषा हिरे,संगीताबाई दांडगे आदींनी औक्षण केले. मोठ्या भक्ती भावाने व उत्साहात शहरात दुर्गा मातेची घटस्थापना करण्यात आली. शक्ती दुर्गा उत्सव मंडळ नारळीबाग येथील संदीप सुरडकर, हरिदास शिंदे, रघुनाथ बावस्कर,भगवान जोहरे, केतन शिंदे, अक्षय गव्हाणे ,अजय पाटील, विजय गव्हाणे, मयूर शिंदे, वैभव अहिरे ,सुभाष अहिरे, देवानंद जोहरे ,राहुल हिरे,गोलू शिंदे, मयूर हिरे, ऋतिक पुसे, करण चौधरी,ओम दुसाने, दत्तू एन्डोले, राम इंडोले, ईश्वर दांडगे, राजू सुरडकर, समाधान लाटे, पंकज लाटे, प्रणव मांडवे, गौरव मांडवे, रोहन नवगिरे, विशाल सोनवणे, पवन राठोड, भिका बावस्कर, संभा बावस्कर, विनोद पवार, विशाल पवार, मंगेश मंडवे, तुषार जाधव, भारत बावस्कर, मयूर शेळके, सागर गवळे, गणेश बावस्कर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments