सोयगाव तालुक्यातील गलवाड्यात नवरात्रोत्सवासाठी वणीच्या गडावरून ज्योत आणण्याची परंपरा कायम-




दिलीप शिंदे 
सोयगाव, दि. ११ ( – सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावरून पवित्र ज्योत आणण्याची परंपरा जपण्यात येत आहे. गावातील युवक श्रद्धा आणि भक्तिभावाने ज्योत आणण्यासाठी वणीच्या गडावर जातात. 

ही ज्योत घेऊन युवक सोयगावमार्गे गलवाडा येथे दाखल होताच गावातील भाविक भक्त आणि नागरिकांकडून ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत स्वागत केले जाते.पहिल्या माळेला ज्योत गावात आणल्यानंतर दुर्गादेवीची घटस्थापना करण्यात येते. या परंपरेमुळे गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण भक्तिमय होते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गावातील युवकांचा उत्साह आणि भाविकांची श्रद्धा यांचे दर्शन घडते.सतीश लवटे, संतोष औरंगे, गोपाल चक्के, देवा सुरडकर, प्रथमेश निकम, हिमाल इंगळे, विजय सोनवणे, सुनील इंगळे, शिवा जाधव, हर्षल इंगळे, प्रेम इंगळे, राहुल तायडे, गुरमीत निकाळजे, हार्दिक बिरारे, जय बावस्कर, संतोष इंगळे, नरेंद्र इंगळे, गोरख कल्याणकर, परमेश्वर लवटे, प्रवीण जोहरे, आकाश गायकवाड, रितेश मंडवे, दीपक सोनवणे, संदीप माजाटे आणि सौरव सोनवणे या युवकांचा ज्योत आणण्यात सहभाग असतो.

Post a Comment

0 Comments