वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र बिलोणी येथील आई तुळजाभवानी श्री क्षेत्र तुळजापूरचेच उपपिठ मानले जाते.



वैजापूर:- वार्ताहर
वैजापूर तालुक्यातील बिलोनी येथे नवरात्र उत्सवा निमित्ताने मराठवाड्या व्यतीरिक कोपरगाव, येवला, श्रीरामपुर येथील मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. हि बिलोणी गावची ग्रामदेवता आई तुळजाभवानी आहे. मुख्य तुळजापूरच्या तुळजाभवानीचीच ही उप-पीठ / ग्रामस्वरूप मूर्ती मानली जाते. गावात तुकाई देवीचे मंदिर पण आहे, त्यासमोर दिपमाळ आहे.
पुरातन अशा या मंदिराचा तुळजाभवानीचा सर्वात जुना उल्लेख शोधताना, *इ.स. १७६५ साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बिलोनी गावातील तुकाई मंदिरासमोरच्या दीपमाळेवर तुळजापूरचा उल्लेख* सापडल्याची नोंद मराठी विश्वकोशात आहे. यावरून हे मंदिर किमान 250+ वर्षांपेक्षा जुने आहे हे सिद्ध होते. 
नवरात्रात नऊ दिवस देवीची घटस्थापना, गोंधळ, जागरण आणि महाप्रसाद असतो
मराठवाडयातील वेजापूर,गंगापूर, कन्नड बरोबरच येवला, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यातील अनेक शेतकरी कुटुंबांची ही कुलदेवता आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख आहे. संकटातून तारण्यासाठी आई तुळजाभवानीची आराधना केली जाते.

Post a Comment

0 Comments