दिलीप शिंदे
सोयगाव दि. २७ सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मुला मुलींना मार्गदर्शन करण्यात आले तसेच राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत मुला मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत मुला मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी सौ.शितल डोके, औषध निर्माता आकाश चावरे यांची उपस्थिती होती. आरकेएसके चे अतुल मुळे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. दरम्यान राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सोयगाव तालुक्यात २७ ऑक्टोबरला १ ते १९ वयोगटातील बालकांना जंतनाशक औषध देण्याची मोहीम राबविण्यात आली. वंचित बालकांसाठी तीन नोव्हेंबरला मॉप-अप दिन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा यांनी दिली.
0 Comments