आजची संकष्ट चतुर्थी हि दाशरथी चतुर्थी व करक चतुर्थी तसेच करवा चौथ असल्याने श्रीरामासह शिव परिवाराची मनोभावे पूजा केल्याने लाभते अध्यात्मिक शांती--महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज

शिर्डी (प्रतिनिधी)-आज अश्विन कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी असून ही दशरथी संकष्ट चतुर्थी किंवा करक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते या दिवशी करवा चौथ ही साजरा केला जात आहे. असा हा योग आज 29 ऑक्टोबर 2026 गुरुवार रोजी जुळवून आला आहे भाविक भक्तांनी या दिवशी मनोभावे दशरथ पुत्र श्रीराम तसेच शिव परिवारातील श्री गणेश पार्वती दुर्गामाता व शिव भोले ची मनोभावे प्रार्थना केली उपसना केली तर नक्कीच मानसिक आध्यात्मिक शांती मनाला मिळाल्याशिवाय राहत नाही असे मत श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे महंत व श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संन्यासी स्वामी आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे. 


   महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज हे आज या शुभ दिनी नाशिक त्रिंबक कडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भारताच्या महामहीम राष्ट्रपती यांच्या शुभहस्ते ,व मुख्यमंत्री तसेच अनेक मंत्री गण साधुसंतांच्या उपस्थितीत होत असलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी रवाना झाले. तत्पूर्वी सावळी विहीर येथे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांचे ह भ प मनोज महाराज बिडवे, सुनील कदम, योगेश पाचोरे, व साधकांकडून स्वागत करण्यात आले.
  यावेळी म्हणतात आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगितले की आज गुरुवार 29 ऑक्टोबर 2026 हा संकष्ट चतुर्थीचा चांगला योग आहे. या चतुर्थीला दा शर्यती चतुर्थी किंवा करक चतुर्थी म्हणतात. त्यादिवशी करवा चौथ महिला साजरा करतात. असा हा दिवस असल्याने या दिवशी नाशिक त्रिंबकेश्वर येथे साधू महंत यांच्या सानिध्यात सत्संग होणार आहे. असे सांगत आजच्या शुभ दिनाचे महत्त्व सांगताना महाराज म्हणाले की, दाशरथी 
म्हणजे दशरथाचा पुत्र श्री प्रभू राम होय. राज्य अध्यक्ष राज्याच्या स्मरणार्थ आणि गणेशजीच्या पूजेशी ही चतुर्थी जोडलेली आहे. राजा दशरथांचा त्याग व चनिष्ठ आणि पितृ धर्म यांची भावना गणेशाच्या विघ्ननाशक स्वरूपाशी जोडणारी ही अद्वितीय अशी चतुर्थी आहे. या चतुर्थीला राजा दशरथाच्या पवित्र चरित्राचे स्मरण केल्यास पितृदोष शांत होतात आणि कौटुंबिक त्रास दूर होतात. तसेच या संकष्ट चतुर्थीचे अधिपती भगवान गणेश आहेत त्यांच्या पूजनाने जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होतात. वाईट गोष्टींचा नाश होतो.आज करवा चौथ आहे. आज अनेक स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या आनंदासाठी करवा चौथचे व्रत करत आहेत. या व्रताविषयी असे मानले जाते की, चंद्रदर्शन होईपर्यंत अन्न-पाणी ग्रहण केले जात नाही. या निर्जल व्रताची एक खास कथा आहे. असे म्हणतात की, भगवान शिवशंकरांनी देवी पार्वतीला या व्रताची कथा सांगितली होती. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी तीच कथा द्रौपदीला सांगितली. देवी पार्वती आणि द्रौपदी यांनीही हे व्रत केले होते. 
करवा चौथचे व्रत कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला केले जाते. त्यामुळे करवा चौथचा दिवस भगवान गणेशजींनाही समर्पित असतो. या दिवशी देशाच्या अनेक भागांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रतही ठेवले जाते आणि भगवान गणेशजींची पूजा केली जाते. अशा वेळी, करवा चौथच्या दिवशी व्रत ठेवून चंद्राला अर्घ्य दिल्यास भगवान गणेशजी प्रसन्न होऊन कृपा करतात, अशी श्रद्धा आहे.
करवा चौथमध्ये मातीचा करवा खूप महत्त्वाचा असतो. या करवाशिवाय करवा चौथचे व्रत पूर्ण होत नाही. स्त्रिया एकत्र येऊन या व्रताची पूजा करतात. असे मानले जाते की, हा करवा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्यातील प्रेम वाढवण्यासाठी असतो. करवा चौथ व्रताविषयी अशी एक आख्यायिका आहे की, करवा माता एक सती स्त्री होत्या. त्यांनी मृत्यूच्या तोंडातून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. तेव्हापासून सुवासिनी स्त्रिया करवा मातेची पूजा करतात आणि प्रार्थना करतात की, "हे करवा माते, जसे तू आपल्या पतीचे प्राण वाचवले, तसेच माझ्या पतीचेही रक्षण कर."व करवा माता ती रक्षण करते. अशी सर्व भावी भक्तांची श्रद्धा आहे. अशा या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आहेत. सर्वांनी अशा या शुभ दिनी मनोभावे श्री गणेश शिव पार्वती व श्रीरामाची मनोभावे पूजा करावी. असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी साधक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments