अशोक कारखाना तोट्यात गेल्यास चेअरमन व संचालकांना जबाबदार धरणार... ॲड अजित काळे



टाकळीभान प्रतिनिधी: अशोक कारखान्यास शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की मी अशोक कारखान्याचा सभासद असून यावर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालला तर यामध्येच सर्व सभासद शेतकरी कामगारांचे हित आहे. 


परंतु हे करत असताना कारखान्याचा वाढता चालता तोटा व सातत्याने शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले होते. व या सततच्या अपयशामुळे यावर्षीचा ऊस हंगामामध्ये सभासदांमधील वाढलेला अविश्वास बघता, आता व बाहेरील कारखान्यांची वाढलेली अवाजवी ऊस गाळप क्षमता स्पर्धांमध्ये टिकण्यासाठी या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस तोडीसाठी टोळ्या आणल्या जात आहेत व यामुळे निर्माण होणाऱ्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी, ऊस दराबाबत निर्णय जाहीर करावा ही मागणी ऊस तोडणी सुरू करण्या अगोदर केली होती. त्याचप्रमाणे बाहेरील कार्यक्षेत्रातून आणण्यात येणारा ऊस करार केल्याशिवाय आणू नये.
तसेच बाहेर काटा केलेले वाहनांना कारखान्यामध्ये होत असलेल्या अडवणुकीबाबत आपल्या कारखान्यातील काटा अचूक आहे तर पंचगंगा व इतर कारखान्याच्या धर्तीवर बाहेरून काटा करून आणला तरी काही तफावत नसल्यामुळे,आपला अशोक सहकारी साखर कारखान्याचा काटा अचूक असल्यामुळे हरकत नाही हे जाहीर करावे. तसेच वार्षिक अहवालामध्ये दाखवण्यात येणारा उत्पादन खर्च व वास्तविक खर्च यामध्ये तफावत असल्यामुळे याचा तोटा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊस दरामध्ये होतो. यामुळे कारखान्याने उत्पादन खर्च कमी कसा होईल याकडे लक्ष द्यावे अशा अनेक बाबतींमध्ये आम्ही केलेल्या मागण्यांकडे गांभीर्याने न बघता दुर्लक्ष केलेले आहे.
 अनेक महिन्यांपासून कामगारांचे पगार प्रलंबित आहेत. 

ह्या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये कारखाना जास्तीत जास्त दिवस पूर्ण क्षमतेने चालला तरच मागील हंगामामध्ये झालेला तोटा यावर्षी कमी होऊ शकतो. परंतु दारोदार फिरून ऊस द्या म्हणण्या ऐवजी आम्ही केलेल्या मागण्यांची पूर्तता करून सभासदांना आपण विश्वासात घेऊन आश्वस्त करणे गरजेचे होते, परंतु हे आपण करत नसल्यामुळे कमी दिवस कारखाना चालला तर उत्पादन खर्चामध्ये वाढ होणार आहे.

त्यामुळे मेंटेनन्सचा खर्च, कर्मचारी व व्यवस्थापन खर्च, कर्जावरील व्याज वाढणार आहे. वीज निर्मिती तसेच उपपदार्थ उत्पादन यामध्ये घट होणार आहे. त्यामुळे यावर्षी मागील वर्षी झालेल्या तोट्यापेक्षाही अधिकचा तोटा होऊ शकतो. यासाठी सर्वस्वी चेअरमन तसेच संचालक मंडळ वैयक्तिक जबाबदार असेल. त्या संदर्भात होणार्या तोट्याची व नुकसानीची कायदेशीर जबाबदारी निश्चित करुन व वसुलीची कारवाई करावी लागेल.सदर बाब ही सर्व संचलकांना अवगत करावी असे काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
 निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी साहेबराव चोरमल, , शिवाजीराजे पटारे, ॲड प्रशांत कापसे, शरद आसने, अध्यक्ष युवा आघाडी शेतकरी संघटना, श्रीरामपूर उपाध्यक्ष संदीप उघडे, सुजित बोडखे, भाऊसाहेब गव्हाणे,खंडेराव सरोदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments