टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव शिवारात आज बुधवार दि.२१ रोजी दुपारी १२ .४५ च्या सुमारास वीजेच्या तारेवरील शॉर्ट सर्किट आग लागून. गट नंबर २५३ मधील बाळासाहेब दत्तात्रय आदिक, विजय दत्तात्रय आदिक, निर्मला विजय आदिक ,द्वारकाबाई बाळासाहेब आदिक, शाम बाळासाहेबा आदिक, प्रदीप विजय आदिक, गट नंबर २५१ मध्ये तसेच आदिनाथ कडुबा आसने, नितीन गोरक्षनाथ आसने ,सुनील गोरक्षनाथ आसने भागचंद अण्णासाहेब आसने ,नितीन गोरक्षनाथ आसने अंदाजे 20 एकर ऊस आगीत जळून होरपळून निघाला.
आदिक बंधूचे ऊस क्षेत्राचा सर्वाधिक समावेश आहे.
अशोक कारखाना अग्निशामक बंद नादुरुस्त असल्याने, नगरसेविका मंजुश्री मुरकुटे व सिध्दार्थ मुरकुटे यांनी तातडीने श्रीरामपूर नगरपालिका अग्निशामक दल पाठविण्यास सहकार्य केले अग्निशामक नामक बंब येईपर्यंत वाऱ्यामुळे आदिक यांच्या शेतातील ऊस संपूर्ण जळालेला होता.मात्र पूर्वेकडील भागवत आण्णासाहेब आसने,व अन्य शेतकऱ्यांचे ऊसाची आग अग्निशामक दलाने आटोक्यात आणली.
0 Comments