पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना रौप्यपदक ----मुलींच्या बुद्धिबळ संघाची सलग तीन वर्षांपासून पदकांची परंपरा कायम----




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१८--पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक प्राप्त केले. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु. संस्कृती वानखेडे आणि कु. सानिया तडवी यांनी चमकदार कामगिरी केली. संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या मुलींच्या बुद्धिबळ संघाने गेल्या तीन वर्षांपासून आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये सातत्याने पदकांची कमाई केली आहे.

 या सातत्यपूर्ण यशामुळे महाविद्यालयाची क्रीडा क्षेत्रातील परंपरा अधिक बळकट झाली आहे. विद्यार्थिनींची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यांमुळे हे यश संपादन करणे शक्य झाले.या यशस्वी विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. निलेश गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी सराव आणि स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर हे यश मिळविले.
या उल्लेखनीय यशाबद्दल अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे, सचिव प्रकाश काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे, कार्यालयीन अधीक्षक पंकज साबळे तसेच संस्थेतील पदाधिकारी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments